ओबीसी नेते मंत्री भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

ओबीसी नेते मंत्री भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या
Published on
Updated on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणार्‍या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दमदाटीची भाषा करणार्‍या व खालच्या पातळीवर बोलणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विधानसभेत एक चकार शब्दही का काढला नाही, असा सवाल करत भुजबळ यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंदापूर तालुका माळी परिषदेचे अध्यक्ष
अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी केली. विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्री भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केल्यानंतर चव्हाण यांच्यासह त्यांची बाजू उचलून धरणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बच्चू कडू व भास्कर जाधव यांचा गुरुवारी (दि. 14) निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी चौकात इंदापूर तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला. या वेळी अ‍ॅड. यादव बोलत होते.

संबंधित बातम्या :

अ‍ॅड. यादव म्हणाले, भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. 9 डिसेंबर रोजी ओबीसींचा प्रचंड मोठा महामेळावा झाला. ते सहन न झाल्याने वरील चार नेत्यांनी भुजबळ यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. विधानसभेत चव्हाण यांनी जरांगे यांच्याविषयी एकही चकार शब्द काढला नाही. तुमचं झाकून ठेवायचं आणि आमचं उघड करायचं हे बरोबर नाही. आतापर्यंत आम्ही तुमच्यामागे राहिलो, ही आमची मोठी चूक झाली आहे. यापुढे असे वक्तव्य ओबीसी बांधव सहन करणार नाहीत, असेदेखील अ‍ॅड. यादव या वेळी म्हणाले.
या वेळी सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू व महादेव पाटील यांनीही झालेल्या घटनेचा निषेध केला. याप्रसंगी देवराज जाधव, दशरथ डोंगरे, दत्तात्रय शेंडे, तुकाराम करे, बजरंग राऊत, अ‍ॅड. श्रीकांत करे, अ‍ॅड. सचिन राऊत, संदीप भोंग, बबन खराडे, अ‍ॅड. सुभाष भोंग, माणिक भोंग, दादा पाटील, संतोष गदादे, विक्रम जगताप, माणिक ननवरे, विजय पाटील, मारुती घनवट, चंद्रकांत शेंडे, सागर ढगे, अमोल चांदणे, तात्या जगताप, शंकर भोसले, लक्ष्मण फरांदे, काशिनाथ भोंग यांची उपस्थिती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news