दिल्ली पुन्हा हादरली! एका प्लास्टिक पिशवीत तरूणीचं डोकं तर दुसऱ्यात शरीराचे तुकडे

दिल्ली पुन्हा हादरली! एका प्लास्टिक पिशवीत तरूणीचं डोकं तर दुसऱ्यात शरीराचे तुकडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत आणखी एक थरकाप उडवणारे हत्याकांड उघडकीस आले आहे. गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ३० ते ३५ वयोगटातील तरूणीचा मृतदेह आढळला. प्लस्टिकच्या दोन बॅगमधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. एका प्लॅस्टिमध्ये डोक तर दुसऱ्यात शरिराचे अवयव आढळले. अगदी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील महरोली परिसरात श्रद्धा वालकरची हत्या करीत तिच्या शरीराचे तुकडे फेकून देण्यात आले होते. या घटनेला काही महिने लोटल्यानंतर अशाचप्रकारचे हत्याकांड उघडकीस आल्याने कायदा-सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. मृतदेहाचे अनेक तुकडे उड्डाणपुलाच्या आजूबाजूला फेकून देण्यात आले होते. दरम्यान लांब केसांवरून मृतदेह महिलेचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त परमादित्य यांनी दिली आहे. तुर्त पोलिसांकडून उड्डाणपुलाजवळ लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. रात्रीच्या अंधारात परिसरात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्यांची यादी पोलिसांकडून मागवून घेण्यात आली आहे.

दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हत्याकांडानंतर दिल्ली पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याप्रकरणी पोलिसांना नोटीस बजावणार असून मृत तरुणी कोण होती? तिच्या मारेकऱ्याला कधीपर्यंत अटक करणार? एकापाठोपाठ एक थरकाप उडवणाऱ्या हत्या दिल्लीत का होत आहेत? असे सवाल उपस्थित करीत कायदा व्यवस्था कोलमडली असल्याची संतप्त प्रतिक्रिया मालीवार यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news