रामलल्लासाठी महाराष्ट्रातील भक्तांकडून ८० किलो वजनाची तलवार भेट

रामलल्लासाठी महाराष्ट्रातील भक्तांकडून ८० किलो वजनाची तलवार भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली. २३ जानेवारीला पहिल्याच दिवशी पाच लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा पाया रचला गेला तेव्हापासून देशातील रामभक्त देणग्या आणि भेटवस्तू देत आहेत. आता महाराष्ट्रातील भक्तांनी ८० किलो वजनाची ७ फूट ३ इंच लांब तलवार प्रभू राम लल्लाला दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून मंदिराचे दरवाजे सार्वजनिक करण्यात आले. राम मंदिरामुळे अयोध्या धार्मिक राजधानी म्हणून नावारूपास येत आहे. भाविकांचा ओघ कायम राहणार असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला या मंदिरामुळे बूस्टर मिळणार असल्याचे देश-विदेशातील वित्तीय संस्थांनी म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी देशातील रामभक्तांकडून अनेक भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत. १०८ फूट लांब अगरबत्ती, २१०० किलो वजनाची घंटा, ११०० किलो वजनाचा दिवा, सोन्याच्या पादुका, १० फूट उंच कुलूप आणि चावी यासह एकाच वेळी ८ देशांची वेळ दर्शवणारे घडय़ाळ अशा कित्येक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर येथून देखील विशेष भेटवस्तू अयोध्येमध्ये पाठविण्यात आल्या. महाराष्ट्रातील भक्तांकडूनही रामल्लाला विशेष भेटवस्तू देण्यात आली आहे. तब्बल ८० किलो वजनाची तलवार प्रभू राम लल्लाला दिली आहे. ही तलवार ७ फूट ३ इंच लांब आहे.

रोज 3 लाख भाविक अपेक्षित

अयोध्येला दररोज १ लाख भाविक भेट देतील आणि नजीकच्या काळात ही संख्या ३ लाखांवर जाईल. प्रत्येक पर्यटकाने अडीच हजार खर्च केल्यावर केवळ अयोध्या नगरीचे उत्पन्न २५ हजार कोटींवर जाईल. उत्तर प्रदेशातील एकूण पर्यटनामुळे या राज्याला वर्षाला १ लाख कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकतो. यामध्ये वृद्धी होऊन उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था ४ लाख कोटींवर जाईल, असा अंदाजही वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news