George Soros : जॉर्ज सोरोस यांनी मुलाला नेमले उत्तराधिकारी

George Soros : जॉर्ज सोरोस यांनी मुलाला नेमले उत्तराधिकारी

Published on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आपले साम्राज्य मुलगा अलेक्झांडर सोरोस (Alexander Soros) यांच्याकडे सोपवले आहे. अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या माहितीनुसार जॉर्ज सोरोस यांनी आपल्या मुलग्याला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले आहे. (George Soros)

मानवाधिकार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी जॉर्ज सोरोस आपल्या सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून जगभरातील 120 देशांत दरवर्षी 12 हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचे सांगितले जाते; मात्र सोसायटीच्या माध्यमातून अन्य देशांच्या लोकशाहीत हस्तक्षेप केला जात असल्याचा जॉर्ज सोरोस यांच्यावर आरोप आहे. सोसायटीचे काम आपल्या पाच मुलांनी पाहावे, अशी जॉर्ज सोरोस यांची इच्छा होती; मात्र ही जबाबदारी 37 वर्षीय अलेक्झांडर यांच्याकडे सोपवली आहे. अलेक्झांडर आता सोसायटीचे चेअरमन म्हणून काम पाहतील. यानंतर अलेक्झांडर म्हणाले की, मी माझ्या 92 वर्षीय वडिलांपेक्षा अधिक राजकीय आहे; मात्र माझी विचार करण्याची क्षमता वडिलांसारखीच आहे. वडिलानंतर आता मी आपल्या कमाईचा वापर उदारमतवादी राजकीय नेत्यांच्या समर्थनासाठी करणार आहे. (George Soros)

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणे चिंताजनक (George Soros)

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास ही बाब अमेरिकेसाठी चिंताजनक असेल. राजकीय नेत्यांनी मागणी केली, तरच मी त्यांच्यासाठी फडिंग करण्यास तयार असल्याचे अलेक्झांडर यांनी सांगितले. दरम्यान, जॉर्ज सोरोस यांनी ट्रम्प यांना ठग असे संबोधल होते. अलेक्झांडर 2024 मध्ये अमेरिकेच्या निवडणुकीला फंडिंग करणार आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news