Gautami Patil : गौतमी पाटीलच्या शाळेतील नृत्यावरून शरद पवारांची टीका; म्हणाले, ‘हा आदर्श…’

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या शाळेतील नृत्यावरून शरद पवारांची टीका; म्हणाले, ‘हा आदर्श…’

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शाळा दत्तक घेण्याच्या प्रकारावर राज्यातील सर्वच क्षेत्रातून टीका होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही (Sharad Pawar) या निर्णयावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. नाशिकमध्ये मद्य तयार करणाऱ्या कंपनीने शाळा दत्तक घेतली आणि या शाळेत गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला, शाळेतील विद्यार्थ्यांसमोर हा आदर्श ठेवणार आहोत का, त्यामुळे शाळा दत्तक घेणाच्या निर्णयाला आपण विरोध केला पाहिजे, असं म्हणत शरद पवारांनी सरकारवर टीका केली.'

आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा झाला. या मेळाव्याला संबोधित करताना पवारांनी ही टीका केली. गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या नृत्यावरून यापूर्वीच वाद निर्माण झाले आहेत. आता पवारांच्या टीकेनंतर यात आणखीच भर पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, त्या खासगी कंपनीला दिल्या जात आहेत. त्या सीएसआर फंडातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जी शाळा त्यांनी दत्तक घेतली आहे. त्याला नाव देण्याचा अधिकार त्यांना आहे. भविष्यात त्या कंपनीला शाळेत हस्तक्षेप करायचा अधिकार आहे. शाळेचा वापर खासगी कारणासाठी होईल, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news