गौतमीच्या डीजे शोवर भारी पडली माधुरी पवारची मराठमोळी लावणी

madhuri pawar
madhuri pawar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : माधुरी पवार आणि गौतमी पाटील अशी दोन नावं आठवतात. कारण महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यात या दोघी अग्रेसर आहेत. अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नृत्यांतून जनतेची मने जिंकली आहेत. दोघींचाही फॅन क्लब प्रचंड मोठा आहे. आतापर्यंत या दोघींना चाहत्यांनी वेगवेगळ्या मंचावर पाहिले आहे. पण नुकतंच, इतिहासात पहिल्यांदाच या दोघी एकत्र आणि एकाच मंचावर दिसल्या. हडपसर येथील एका कॅफेच्या उद्घाटनावेळी दोघी एकत्र आल्या.

माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसेच दोघींचीही नृत्य सादर करण्याची शैली देखील वेगळी आहे. दोघींचीही क्रेझ जास्त असली तरी सुध्दा या कार्यक्रमात गौतमीच्या डीजे शो वर माधुरीची मराठमोळी लावणी भारी पडली.

झी युवा वरील 'अप्सरा आली' या डान्स रिॲलिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश कमवले. स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री, नृत्यांगना आहे, हे या कार्यक्रमात माधुरीने सिध्द करुन दाखवलं. माधुरीने सादर केलेल्या लावणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि तिचे कौतुक देखील झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news