Gautam Navlakha: नजरकैदेची जागा बदलण्याची गौतम नवलखा यांची मागणी; सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

Gautam Navlakha: नजरकैदेची जागा बदलण्याची गौतम नवलखा यांची मागणी; सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: एल्गार परिषद तसेच नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याच्या आरोपाखाली नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी मुंबईतील नजरकैदेची जागा बदलण्याची विनंती केली आहे. शुक्रवारी (दि.२१) त्यांनी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात अर्ज दाखल केला. सध्या नवलखा एका सार्वजनिक वाचलनालयात नजरकैदेत असून, ही जागा आता खाली करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांच्या वकिलाने न्या.के.एम.जोसेफ तसेच न्या.बी.वी. नागरत्ना यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

नवलखा यांच्या वकिलाने प्रकरणावर तात्काळ सुनावणीची मागणी केली. केवळ मुंबईतच नजरकैदेची जागा बदलण्याची याचिका करीत असल्याचे वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले. न्यायालयात दुसऱ्या प्रकरणासाठी हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटरल जनरल एस.वी.राजू यांनी संबंधीत अर्जासंबंधी माहिती नसून, उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला. खंडपीठ पुढील आठवड्यात शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेणार आहे.

२०१८ मध्ये नवलखा यांना अटक करण्यात आली होती. अगोदर त्यांना घरातच नजरकैद करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एप्रिल २०२० मध्ये त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. सुप्रिम कोर्टाने १० नोव्हेंबर २०२२ मध्ये आरोग्याचे कारण पुढे करीत नवलखा यांना नजरकैदेत पाठवण्याची त्यांची याचिका मंजूर केली होती. नवलखा सध्या ठाण्यातील नवी मुंबईत राहत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news