Ganesh Chaturthi 2023 : नाशिक जिल्ह्यातील ८०० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’

Ganesh Chaturthi 2023 : नाशिक जिल्ह्यातील ८०० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील ८०० हून अधिक गावांमध्ये 'एक गाव एक गणपती' संकल्पनेनुसार गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बळकट करण्यास मदत होत असून, पोलिसांनीही गणेशाेत्सवात बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे. शहर व ग्रामीण भागात सुमारे ५ हजार पोलिस अंमलदारांसह अतिरिक्त पथकांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दल आणि दशहतवादविरोधी पथकाचाही समावेश आहे. (Ganesh Chaturthi 2023)

संबधित बातम्या : 

शहरात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार सार्वजनिक मंडळांसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर 'क्यूआर कोड' लावण्यात आले असून, ते पोलिसांकडून दिवसातून तीनदा स्कॅन होणार आहेत. त्यामुळे पोलिसांचा वावर कायम दिसणार असून टवाळखोर, गुन्हेगारांवर यामुळे वचक ठेवता येणार आहे. तर नाशिक ग्रामीणसह मालेगावात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार बंदोबस्ताची आखणी झाली आहे. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे बंदोबस्त नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. मालेगावात अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या सूचनेनुसार पथके कार्यरत आहेत. पोलिसांच्या सर्व यंत्रणांना अहोरात्र पहारा देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अनंत चतुर्दशीनंतर २९ सप्टेंबरला शहरासह जिल्ह्यात, ३० सप्टेंबरला येवला शहरात, तर १ ऑक्टोबरला सिन्नरमध्ये ईद ए मिलादची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे याठिकाणी बंदोबस्त कायम राहणार आहे. (Ganesh Chaturthi 2023)

ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, २ अपर पोलिस अधीक्षक, ८ उपअधीक्षक, ५ निरीक्षक, ३ सहायक निरीक्षक, ८ उपनिरीक्षक, १२७ अंमलदार, २०० नवनियुक्त अंमलदार, १ हजार ६५० हाेमगार्डचे जवान, ६ तुकड्या दंगल नियंत्रण पथक, ३ तुकडी राज्य राखीव दल असे मनुष्यबळ कार्यरत आहेत.

शहर पोलिसांचा बंदोबस्त

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ उपआयुक्त, ७ सहायक आयुक्त, ५९ निरीक्षक, ६७ सहायक निरीक्षक, १२७ उपनिरीक्षक, सुमारे तीन हजार पोलिस अंमलदार, एक हजार हाेमगार्डचे जवान, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दल, जलद प्रतिसाद पथक, गुन्हे शोध तीन पथकांसह इतर चार पथकांचा बंदाेबस्त तैनात आहे.

मालेगाव, मनमाडला अतिरिक्त बंदोबस्त

शहरासह जिल्ह्यात बॉम्बशोधक व नाशक पथकांमार्फत संवेदनशील ठिकाणी नियमित पाहणी केली जात आहे. मालेगाव, मनमाड, येवला शहर, सटाणा येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. गुडमॉर्निंग पथक, गस्ती पथक, बीटमार्शल, होमगार्डकडून प्रत्येक घटनेची माहिती संकलित होणार आहे. धार्मिक स्थळांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात असून, दहशतवादविरोधी पथकाकडून संवेदनशील ठिकाणी पाहणी सुरू आहे. अधिकाऱ्यांसोबत जलद प्रतिसाद पथक राहणार आहे. तसेच विसर्जनावेळी प्रत्येक दोन तासांनी नियंत्रण कक्षात घडामोडींची नोंद होणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news