मलेशियातील उत्खननातून संस्कृतातील प्राचीन शिलालेख सापडले आहेत. मलेशियाच्या दरबारातील पंडितांना संस्कृताचे ज्ञान होते. गंधमादन पर्वताचे ठिकाण इंडोनेशियात आहे, असे क्रोम या डच विद्वानाचे मत आहे. दुसरीकडे ह्मिवटले या विद्वानाच्या मते हा पर्वत मलायातील (मलेशियाचे जुने नाव) एका बेटावर होता. (Ram Temple ceremony)तिसरीकडे, म्यानमारमधील पोपा पर्वत हाच गंधमादन पर्वत असल्याचे म्यानमारच्या लोकांचे म्हणणे आहे. पोपा पर्वत हा औषधी वनस्पतींसाठी आजही खास म्हणून ओळखला जातो. लक्ष्मणाच्या उपचारासाठी हनुमानाने पोपा पर्वताचाच एक भाग उखडून नेला होता, असा या लोकांचा दावा आहे.
पोपा पर्वतातील एक भाग कधीकाळी कुणीतरी उखडून टाकलेला असल्याचे डोळ्यांना दिसते. इथले गाईड पर्यटकांना हे ठिकाण आवर्जून दाखवितात आणि हनुमानाने हा भाग उखडून नेल्याचे सांगतात. परतीच्या प्रवासात एकेठिकाणी हनुमानाचा तोल गेला आणि ते पहाडासह कोसळले. त्यामुळे तेथे एक सरोवर तयार झाले. इनवोंग नावाचे हे सरोवर म्यानमारमधील योमेथिन जिल्ह्यात आहे.
श्रीलंकेच्या राजपुत्राने इ. स. 515 मध्ये चिनी सम्राटाला एक पत्र लिहिले होते. त्यात लिहिले होते की, संस्कृतातील मूल्यवान माहिती त्याच्याकडे उपलब्ध आहे. गंधमादन पर्वताप्रमाणे उंच इमारती त्याच्या शहरात आहेत. आपल्याकडे हा पर्वत ओडिशात असून, हनुमानाचे निवासस्थान म्हणून तो ओळखला जातो. लक्ष्मणाचा जीव वाचविण्यासाठी हनुमानाने उपटून लंकेत आणलेल्या पर्वताचे नाव द्रोणागिरी होते, हे येथे उल्लेखनीय!
प्राचीन काळात भारतीय लोक जगात जिथे कुठे गेले अगदी तिथे आपल्या संस्कृतीच्या बळावर अमीट छाप या लोकांनी सोडली. इंडोनेशियातील सुमात्रा बेटाचे नाव लक्ष्मणाची माता सुमित्रा हिच्या नावावरून ठेवले गेले आहे, हे आज कुणालाही खरे वाटणार नाही. जावातील एका शहराचे नाव योग्याकार्ता हे आहे. योग्या हे संस्कृतातील अयोध्या शब्दाचे विकसित रूप आहे. जावाच्या भाषेत कार्ता म्हणजे शहर. या अर्थाने योग्याकार्ता म्हणजे अयोध्या शहर होय.जावातील एका नदीचे नावही सेरयू आहे. जावातील एका गुहेचे नाव किस्किंधा (किष्किंधा) आहे.जावाच्या पूर्वेला सेतुविंदा नावाचे शहर आहे. सेतुबंधवरून ते पडलेले आहे.
हेही वाचा…