Gadar 2 : ‘गदर-२’ चा तिकिटबारीवर धुमधडाका, ४०० कोटींचा गल्ला जमवणार?

Gadar 2
Gadar 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'गदर २' ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड जारी ठेवले आहे. (Gadar 2) सनी देओलच्या चित्रपटाने रविवारपर्यंत भारतीय बाजारात ३५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. २० ऑगस्ट रोजी दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप जबरदस्त सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. सनी देओल-अमीषा पटेल यांचा चित्रपट आता ४०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. (Gadar 2)

१० व्या दिवशी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी 'गदर २' ने ४० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. आणि ३५० कोटी रुपयांचा आकडा पार केला. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३७६.२० कोटी रुपयांचे झाले आहे. 'गदर २'मध्ये कहाणी तारा सिंहच्या अवतीभोवती फिरते.

अनिल शर्मा यांचा हा चित्रपट आज ४०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमिषा पटेल-सनी देओल अभिनित हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news