पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ ने अखेर बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी पार केले आहेत. (Gadar -2 BO Collection) ५०० कोटींच्या कल्बमध्ये पोहोचतातच गदर २ ची सक्सेस पार्टी झाली. रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी ८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. गदर २ मध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. (Gadar -2 BO Collection)
मीडिया रिपोर्टनुसार, गदर २ ने २४ व्या दिवशी साडे आठ कोटींचा गल्ला देशात जमवला आहे. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा एका आठवड्यात २८४ कोटींचे कलेक्शन तेलं होतं. दुसऱ्या आवड्यात हा आकडा ६३.३५ कोटीने वाढला. चौथ्या रविवारी, ८.५० कोटींचा गल्ला जमवला. असे एकूण ५०१.८७ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.
अहवालानुसार, गदर २ हा ५०० कोटींच्या नेट क्लबमध्ये (हिंदीमध्ये) प्रवेश करणारा तिसरा चित्रपट ठरला. ते एसएस राजामौलीच्या बाहुबली २ द कन्क्लूजन (२०१७) आणि शाहरुख खानच्या पठानमध्ये सामील झाला आहे.
चित्रपटाचे हे भव्य यश पाहून सनी देओलने मुंबईत 'गदर 2' ची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सलमान खानपासून कियारा अडवाणीपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.
सनी देओलने मुंबईत 'गदर 2' ची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सलमान खानपासून कियारा अडवाणीपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.