G20 Summit Delhi | भारतातील G20 परिषद जगाला नवीन दिशा देणारी; पीएम मोदी यांच्या अध्यक्षीय भाषणाने परिषदेला सुरुवात

G20 Summit Delhi
G20 Summit Delhi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जर आपण कोरोना सारख्या महामारीला हरवू शकतो, तर G20 मधील देशांच्या विश्वासाच्या जोरावर आपण जगातील कोणत्याही संकटाला सहज हरवू शकतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केला. आजपासून (९ सप्टेंबर) दोन दिवस होणाऱ्या G20 परिषदेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी या परिषदेला उपस्थित सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले आहे. (G20 Summit Delhi)

G 20 शिखर परिषदेत PM मोदी म्हणाले, 21 व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा दाखवण्याचा आणि नवी दिशा देण्याचा महत्त्वाचा काळ आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेत. म्हणूनच मानवकेंद्री दृष्टीकोनातून आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपल्याला पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले. (G20 Summit Delhi)

G20 Summit Delhi : मोरोक्को भूकंपातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

G20 ची कार्यवाही सुरू करण्यापूर्वी, मी मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करू इच्छितो. आम्ही सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. भारत मोरोक्कोच्या मदतीसाठी करण्यास तयार आहे. या कठीण काळात मोरोक्कोला सर्व शक्य मदत केली जाईल. (G20 Summit Delhi)

आफ्रिकन युनियनला G20 चे सदस्यत्व बहाल

सबका साथच्या भावनेने भारताने आफ्रिकन युनियनला G20 चे कायमचे सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव पीएम मोदी यांनी सर्व सदस्यीस देशांपुढे मांडला. मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण या प्रस्तावावर सहमत आहोत. तुमच्या सर्वांच्या संमतीने, मी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना G20 चे स्थायी सदस्य म्हणून त्यांची जागा घेण्यास आमंत्रित करत असल्याचे पीएम मोदी यांनी G20 च्या पहिल्या सत्रावेळी सांगितली.

G20 साठी भारतात २०० हून अधिक सभा- पंतप्रधान

भारताचे G20 अध्यक्षपद हे देशामध्ये आणि देशाबाहेर सर्वसमावेशकतेचे आणि एकतेचे प्रतीक बनले आहे. ही परिषद जणू भारतातील लोकांची G20 परिषद बनली आहे. करोडो भारतीय त्यात सामील झाले आहेत, या परिषदेसाठी देशात ६० हून अधिक शहरांमध्ये २०० हून अधिक सभा झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

'या' जागतिक आव्हानांवर ठोस उपाययोजना करावी लागेल

जागतिक अर्थव्यवस्थेतील गोंधळ, उत्तर आणि दक्षिण विभागणी, पूर्व आणि पश्चिम यांच्यातील अंतर, अन्न, इंधन आणि खत व्यवस्थापन, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा आणि पाणी, वर्तमानाची सुरक्षितता आणि भावी पिढ्यांच्या फायद्यासाठी या आव्हानांवर ठोस उपायांकडे वाटचाल करावी लागेल.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news