सातारा : शहीद जवान विजय शिंदे यांना अखेरचा निरोप; विसापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान विजय शिंदे यांना अखेरचा निरोप
शहीद जवान विजय शिंदे यांना अखेरचा निरोप
Published on
Updated on

सातार, पुढारी वृत्तसेवा : लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.29) विसापूर ता. खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे २६ जवानांचे वाहन श्योक नदीपात्रात शुक्रवारी (ता. २७) सकाळी पडले हाेते. या अपघातात विजय शिंदे यांच्यासह आणखी सहा जवानांना वीरमरण आले. सुभेदार शिंदे यांचे पार्थिव लडाखमधून पुण्यापर्यंत सैन्यदलाच्या विमानाने आणण्यात आले.

रविवारी दुपारी दीड वाजता पार्थिव घरी आणले. त्यानंतर श्री वाघेश्वरी मंदिराशेजारील चावडी चौकात स्टेजवर सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव अत्‍यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर शासकीय इतमामात सुभेदार विजय शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news