नाशिक : नांदुर्डीच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; लोकांची उसळली गर्दी

नांदुर्डीच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार,www.pudhari.news
नांदुर्डीच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार,www.pudhari.news

नाशिक : निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावचे भूमिपुत्र असलेले आणि बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान किशोर गंगाराम शिंदे (33) यांना कर्तव्यावर असताना पंजाबमधील अमृतसर येथे अपघाती वीरमरण आले. त्यांचे पार्थिव अमृतसर, पंजाब येथून आज शुक्रवार (दि. 15) रोजी नांदुर्डी तालुका निफाड येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. नांदुर्डी येथील कऱ्हा नदीच्या किनारी शासकीय इतमामात जवान किशोर शिंदे यांना शेवटचा निरोप देण्यात आला.

निवासस्थानापासून काढण्यात आलेल्या अंतीम यात्रेसाठी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक रंगराव सानप, सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी व जवान, माजी सैनिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुषार खरात, माजी सैनिक अरुण भंडारे, सरपंच, उपसरपंच संतोष आहेर, शिंदे कुटुंबीय व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. सीमा सुरक्षा दल आणि महाराष्ट्र पोलीस यांनी याप्रसंगी जवान किशोर शिंदे यास मानवंदना दिली. किशोर शिंदे हे रानवड साखर कारखान्याचे कर्मचारी गंगाधर केदु शिंदे यांचे सुपूत्र होते. अमृतसर येथील बीएसएफच्या छावणीमध्ये तो आपली पत्नी काजल आणि दीड वर्षे वयाची मुलगी वेदिका यांच्यासमवेत राहत होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news