Fukrey 3 : ‘फुकरे 3’ ची बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी यश

Fukrey 3
Fukrey 3

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुकरे फ्रेंचायझीचा तिसरा भाग 'फुकरे ३' चित्रपटगृहात रिलीज झाला. चित्रपटाचे पहिले दोन प्रीक्वल सुपर-डुपर हिट ठरले होते. आता तिसरा भाग रिलीज झाल्यानंतर चित्रपट समीक्षकांकडीन दमदार प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. 'फुकरे ३' (Fukrey 3) ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली आहे? जाणून घेऊया. (Fukrey 3 )

'फुकरे 3' मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, ऋचा चड्ढा, पंकज त्रिपाठीने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'फुकरे ३' मध्येदेखील हे स्टार्स दमदार अभिनयासोबत मनोरंजनाचा फुल डोस देण्यात यशस्वी ठरले आहेत.

पहिल्याच दिवशी सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी होती. 'फुकरे ३' ने फर्स्ट डे फर्स्ट शोला बंपर ओपनिंग केले आहे.

रिपोर्टनुसार, 'फुकरे ३' रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केली आहे. फुकरे ३ ला बॉक्स ऑफिसवर 'द व्हॅक्सीन वॉर'शी क्लॅश करावं लागत आहे. याचसोबत चित्रपटाला शाहरुख खान स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'शी देखील टक्कर पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सेवटी 'फुकरे ३' कमाईबाबतीत सरस ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fukrey 3 (@fukrey3)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news