मॅचफिक्सिंगच्या आरोपानंतर क्रिकेटर श्रीसंतवर पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा ; वाचा सविस्तर

मॅचफिक्सिंगच्या आरोपानंतर क्रिकेटर श्रीसंतवर पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा ; वाचा सविस्तर

पुढारी ऑनलाईन : माजी क्रिकेटर एस श्रीसंत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. केरळ पोलिसांनी श्रीसंत आणि इतर दोघाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. केरळ येथील रहिवासी असलेल्या सरीश गोपलन या फिर्यादीने ही तक्रार दाखल केली आहे. राजीव कुमार आणि व्यंकटेश किनी यांनी 20 एप्रिल 2019 मध्ये फिर्यादीकडून जवळपास 18.70 लाख रुपये घेतले होते. हे पैसे घेताना या लोकानी दावा केला होता की ते कर्नाटकमधील कोल्लूर येथे एक स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार आहेत. या कंपनीत श्रीसंत याचीही भागीदारी असल्याचं त्यांनी फिर्यादीला सांगितलं.

कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल

गोपालन यांच्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे कि अकादमीमध्ये भागीदारी देण्याचे आमिष त्यांना दाखवले गेले होते. त्यामुळे श्रीसंत आणि त्यांच्या अन्य साथीदारांवर भारतीय दंड विधानाच्या कलम 420 नुसार गुन्हा केला गेला आहे.

श्रीसंत आणि वाद यांचं जुनं नातं…

नकारात्मकतेने श्रीसंत अनेकदा चर्चेत राहीला आहे. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये हरभजनसिंगने कानशिलात लगावल्याने श्रीसंत चर्चेत आला होता. 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत दोषी आढळला होता. बीसीसीआयने त्यांच्यावर यावेळी आजीवन बंदी घातली होती. यानंतर बीसीसीआयने ही बंदी कमी करून केवळ सात वर्षांपर्यंत मर्यादित करण्यात आली होती.

तो सध्या काय करतो..

श्रीसंत सध्या रिटायर्ड क्रिकेटर्सची लीग LLC म्हणजेच लेजण्ड्स लीग क्रिकेटमध्ये खेळतो आहे. यात तो गुजरात जायंटस् या टीमकडून खेळतो आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news