Anant Karmuse assault case | करमुसे मारहाण प्रकरण- जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ, चौथे ५०० पानी आरोपपत्र दाखल

NCP leader Jitendra Awhad
NCP leader Jitendra Awhad
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हील इंजिनीयरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांच्या १५ ते २० समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. (Anant Karmuse assault case) या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन आव्हाड यांच्यासह १३ जणांना अटक देखील करण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन पुरवणी आरोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल केल्यानंतर बुधवारी चौथे ५०० पानी आरोपपत्र ठाणे सत्र न्यायालयात दाखल केले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फोटो वापरून ठाण्यातील आनंदनगर भागात राहणारा सिव्हील इंजिनियर अनंत करमुसे याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या १५ ते २० आव्हाड समर्थकांनी करमुसे यास आव्हाडांच्या नाथ बंगल्यावर नेऊन जबर मारहाण केल्याची घटना ५ एप्रिल २०२० रोजी घडली होती. विशेष म्हणजे ही जीवघेणी मारहाण सुरू असतांना स्वतः जितेंद्र आव्हाड येथे उपस्थित होते. या घटनेतील मारहाण झालेल्या व्यक्तीचे जबर मारहाणीचे फोटो व्हायरल होताच मोठी खळबळ उडाली होती.

ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी या प्रकरणी आव्हाडांची चौकशी करावी अशी मागणी तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी या घटनेची चौकशी करून वर्तकनगर पोलीस ठाण्यात या घटनेतील १५ ते २० लोकांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत आव्हाडांच्या दोघा अंगरक्षकांसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपपत्र यापूर्वी ठाणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. त्यानंतर या गुन्ह्यातील पुढील तपासाच्या अनुषंगाने बुधवारी ठाणे पोलिसांनी तिसरे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. चारशे पन्नास पानी या आरोपपत्रात आमदार आव्हाड यांच्यावर सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्य आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news