![Wrestlers Vs Brij Bhushan | बृजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांना अंतरिम जामीन मंजूर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2FBrijbhushan-Singh.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप असलेले भारतीय कुस्ती संघटनेचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बृजभूषण सिंह यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयात १८ जुलै रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यानुसार आज बृजभूषण सिंह न्यायालयात हजर झाले होते. सिंह यांच्याबरोबर कुस्ती संघटनेचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. (Wrestlers Vs Brij Bhushan )