माजी क्रिकेटपटू रायडूची आठ दिवसांत राजकारणाला सोडचिठ्ठी!, जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला

माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू. 
(संग्रहित छायाचित्र)
माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू. (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने केवळ आठ दिवसांमध्‍येच राजकारणातून बाहेर पडण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍याने आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्‍या वायआरएस काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता. आता त्‍याने काही काळासाठी राजकारण सोडणार असल्‍याचे जाहीर केले आहे. (Former cricketer Ambati Rayudu)

 Ambati Rayudu : काही काळसाठी राजकारणातून ब्रेक

माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडू यांनी आज (दि.६) सकाळी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी (YSRCP) मधून बाहेर पडण्याची घोषणा केली. रायडूने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्‍ट केली असून त्‍याने म्‍हटलं आहे की, तो काही काळासाठी राजकारणातून ब्रेक घेणार आहे.

रायडूने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, "मी वायएसआर काँग्रेस पार्टी सोडण्‍याचा आणि काही काळासाठी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय योग्यवेळी कळवला जाईल. (Former cricketer Ambati Rayudu)

आठ दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत रायडूने वायएसआर काँग्रेस पार्टीमध्‍ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी यांच्यासह जगन मोहन रेड्डी यांनी त्‍यांचे पक्षात स्‍वागत केले होते.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामानंतर रायुडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये त्‍याने ५५ सामने खेळले. त्याने 47.05 च्या सरासरीने एकूण 1694 धावा केल्या. नाबाद 124 धावांची त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news