परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांनी शांत राहावे : शशि थरुर यांचा सल्‍ला

परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांनी शांत राहावे : शशि थरुर यांचा सल्‍ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाश्‍चिमात्य देशांकडून येणाऱ्या टिप्पण्या सामान्य पद्धतीने घेणे मला खूप महत्त्वाचे वाटते. जर आपण प्रत्येक टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली, तर आपण स्वतःचे नुकसान करत आहोत. मी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना थोडे शांत राहण्याची विनंती करतो, अशा शब्‍दांमध्‍ये काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शशी थरुर यांनी परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांना सल्‍ला दिला.

काय म्‍हणाले होते परराष्‍ट्र मंत्री ?

रविवार दिनांक २ एप्रिल रोजी बंगळूरमध्‍ये आयोजित कार्यक्रमात बोलताना परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर म्‍हणाले होते की, "पाश्चिमात्य भारतावर भाष्य का करताना दिसतो याची काही कारणे आहेत. पाश्चिमात्य लोकांना इतरांवर भाष्य करण्याची वाईट सवय आहे. त्यांना असे वाटते की हा त्यांना एक प्रकारचा देवाने दिलेला अधिकार आहे. त्यांना अनुभवातून शिकावे लागेल. यापुढेही ते असेच करत राहिले तर इतर लोकही प्रतिक्रिया देतील. हे त्यांना आवडणार नाही."

यावेळी जयशंकर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना म्‍हटले होते की, तुम्‍ही लोकांना तुमच्‍यावर बोलण्‍यासाठी आमंत्रित करत आहात; मग अधिकाधिक लोक कमेंट करू इच्छितात. आपल्‍या देशात समस्या आहेत असे सांगून जगाला उदार आमंत्रणे देणे थांबवले पाहिजे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news