विदेशी चलन साठ्यात 2.7 अब्ज डॉलर्सची वाढ

विदेशी चलन साठ्यात 2.7 अब्ज डॉलर्सची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विदेशी चलन साठ्यात 2.76 अब्ज डॉलर्सने वाढ झाली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने (RBI) दिली. गेल्‍या आठवडयात विदेशी चलन साठा हा 632.95 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. तत्पूर्वीच्या आठवड्यात हा साठा 1.76 अब्ज डॉलर्सने झाला आहे. आणि तो 630.19 अब्ज डॉलर्सवर आला होता.

फॉरेन करन्सी ऍसेटस अर्थात एफसीएमध्ये वाढ झाल्यामुळे विदेशी चलन साठा वाढला आहे, असे आरबीआयने एका अहवालात सांगितले आहे. या आठवड्यात एफसीएमध्ये 1.49 अब्ज डॉलर्सची वाढ झाला असून, हा साठा 567 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. त्‍याचबरोबर सोन्याचासाठा हा 1.27 अब्ज डॉलर्सने वाढला असून तो 41.50 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्पेशल ड्रॉईंग राईटसचे (एसडीआर) प्रमाण किरकोळरित्या कमी होऊन 19.16 अब्ज डॉलर्सवर आला आहे, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलं का?    

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news