Phone Charging Rules
Phone Charging Rules

Phone Charging Rules : फोन चार्ज करण्यासाठी पाळा 40-80 चा नियम

कॅलिफोर्निया : फोनचा वापर करत असाल तर चार्जिंग Phone Charging Rules हे ओघानेच आले आणि यासाठी 40-80 चा नियम माहिती असणे तितकेच आवश्यक ठरते. फोनमधील बॅटरीचे आरोग्य आणि फोनच्या लाईफसाठी खूप महत्त्वाचे असते. त्या अनुषंगाने 40-80 चा नियम विशेष लक्षवेधी ठरतो, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

सध्या फोनचा वापर बराच वाढला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा अविभाज्य घटक झाला आहे आणि प्रत्येक जण जवळपास 3 ते 7-8 तास फोन रोज वापरतो. आता इतका सलग वापर असेल तर त्या अनुषंगाने चार्जिंग Phone Charging Rules देखील आवश्यक असते.

कोरो प्लॅटफॉर्मवर अनेक लोक म्हणतात की, 40-80 रुल बॅटरी डॅमेज कमी करून बॅटरी लाईफ Phone Charging Rules वाढवण्यात मदत करते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बॅटरीला 40% पेक्षा कमी आणि 80% पेक्षा जास्त चार्ज न करण्याचा सल्ला आहे. संशोधकांचा असा दावा आहे की, 80% पेक्षा जास्त चार्ज केल्याने बॅटरी लाईफ सायकलला झपाट्याने तोटा संभवतो.

एक मॉडर्न फोन बॅटरी (लिथियम-आयन) चे वय 2-3 वर्षे असते. काही लोक असेही म्हणतात की, ऑप्टिमाईज बॅटरी लाईफसाठी फोन कधीही 40% पेक्षा कमी किंवा 80% पेक्षा जास्त चार्ज असू नये. ज्यावेळी स्मार्टफोनची बॅटरी 100% चार्ज होते Phone Charging Rules तेव्हा हे फोनच्या बॅटरीसाठी योग्य नसते. मात्र, अनेक प्लॅटफॉर्म असेही म्हणतात की, यात फारसे तथ्य नाही. तरी सकृदर्शनी फोनची बॅटरी 40 टक्क्यांपेक्षा कमी व 80 टक्यांपेक्षा जास्त असू नये, यावर तज्ज्ञांचे बहुमत असल्याचे संकेत आहेत.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news