बियरची बाटली डोक्यात मारून पाच जणांनी दोन महिलांना लुटले

बियरची बाटली डोक्यात मारून पाच जणांनी दोन महिलांना लुटले

पिंपरी : बियरची बाटली डोक्यात फोडून पाच जणांनी मिळून दोन महिलांना लुटले. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली. छोटा बीच्या उर्फ युवराज संतोष अडागळे, रोहित राजू गायकवाड, सौरभ बाळू अडागळे, आशिष दिनेश माकोडे, दीपक उर्फ दिप्या (सर्व रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण सोमवारी रात्री ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथील शेर पंजाब हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, जेवण झाल्यानंतर त्या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडील पर्स, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 14 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीला मारहाण केली. तसेच, रस्त्यावर पडलेली बियरची बाटली डोक्यात मारून फिर्यादी यांना दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

https://youtu.be/IYYU1mogoqk

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news