Fish and Chips – फिश अँड चिप्स : ब्रिटिश लोकांचा वडापाव, कधी गेला लंडनला तर हमखास खा

Fish and Chips  – फिश अँड चिप्स : ब्रिटिश लोकांचा वडापाव, कधी गेला लंडनला तर हमखास खा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – प्रत्येक प्रांतात कोणती ना कोणती डिश प्रसिद्ध असतेच असते. इटली म्हटले की पिज्झा, महाराष्ट्र म्हटले की वडापाव अशी किती तरी नावे यात सांगता येतील. या यादीतील एक डिश म्हणजे लंडनची फिश अँड चिप्स. लंडनमध्ये फिरताना कोणत्याही परिसरात हमखास मिळणारी डिश म्हणजे फिश अँड चिप्स. सर्वसाधारण ९ ते १२ पाउंडला मिळणारी ही डिशला गमतीने लंडनची राष्ट्रीय डिश असेही म्हटले जाते. (Fish and Chips)

लंडनमधील बहुतांश पार्क, म्युझियम्स, मार्केट आणि इतर कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी फिश अँड चिप्स हमखास मिळते. महाराष्ट्रात जसे वडापाव मिळणार नाही असे ठिकाण नाही, तसे लंडनमध्ये फिश अँड चिप्स मिळणार नाही, असे होऊच शकत नाही. कधी लंडनला गेला तर न चुकता या डिशचा अस्वाद घेतलाच पाहिजे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नावात म्हटल्या प्रमाणेच ही डिश माशांपासून बनते. काटा काढलेल्या माशांच्या फिलेटना कॉर्नफ्लोअर लावून ते तेलात तळले जातात आणि फिंगरचिप्स सोबत देतात. अर्थात ही रेसिपी मोठी आहे. फक्त कॉर्न फ्लोअर लावले आणि तळले असे होत नाही. जर युट्यूबवर रेसिपी सर्च केली तर त्याचे काही भारतीय अवतार ही मिळतील.

एक फिश चिप्सची प्लेट संपवली की दिवसभर भूक लागत नाही. टेस्टही भन्नाट असते. अर्थात फिश अँड चिप्स पौष्टिकही आहे.
एका वेबसाईट नुसार लंडनमध्ये २०१५ या वर्षात ३० कोटी फिश अँड चिप्सच्या डिश खपल्या होत्या आणि निव्वळ लंडनमध्ये फिश अँड डिशचे ८५०० शॉप्स होते. ही संख्या गेल्या ७ वर्षांत वाढलेली असणार हे नक्की. या आकडेवारीवरून या डिशला लंडनची राष्ट्रीय डिश का म्हटले जाते, हे समजून येईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news