Maharashtra Politics : राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्‍वाचे निर्णय

Maharashtra Politics :  राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्‍वाचे निर्णय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे सहकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज (दि.४) उपस्थित राहिले. शिंदे- फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या 'पहिले वर्ष सुराज्याचे' या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन

( ऊर्जा विभाग)

* मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती

(नियोजन विभाग)

• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता

(जलसंपदा विभाग)

• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार

(उद्योग विभाग)

• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ

(विधि व न्याय विभाग)

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.

(महसूल विभाग)

• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र

(कृषि विभाग)

• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news