चिमणाराम वनाजी चौधरी (48), नम्रता उर्फ ज्ञानूदेवी चिमणाराम चौधरी (44), सचिन उर्फ चिकू चिमणाराम चौधरी (10), भावेश चिमणाराम चौधरी (13, सर्व रा. पूर्णानगर, चिखली) अशी होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चौधरी कटुंबीय मूळचे राजस्थान येथील पाली जिह्यातील एका छोट्या खेड्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, चिमणाराम मागील सतरा वर्षांपूर्वी शहरात आले. त्यांनी चिखली येथील एका दुकान भाड्याने घेऊन हार्डवेअरचे दुकान सुरु केले होते. खोली भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी चिमणाराम यांनी दुकानातच संसार थाटला. त्यासाठी दुकानाच्या पोटमाळ्यावर जागा करण्यात आली होती.