पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील सुरपूर पोलिस ठाण्यात मोहम्मद रसूल कदारे या व्यक्ती विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्याने केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास पंतप्रधान मोदी यांना ठार मारु, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेत आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ५०५(१)(बी), २५(१)(बी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरपूर पोलिस हैद्राबादसह विविध ठिकाणी संशयिताचा शोध घेत आहेत, अशी माहिती यादगिरी पोलिसांनी दिली आहे. (Death threat to PM Modi)
फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये संशयिताच्या हातात धारदार शस्त्र दिसून येत आहे. तसेच तो पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अवमानकारक टिप्पणी करताना दिसतो. रसूल हा हैदराबादमध्ये रोजंदारी कामगार म्हणून काम करतो.
गेल्यावर्षी, एका केंद्रीय सुरक्षा एजन्सीला पंतप्रधान मोदींची हत्या आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्फोट घडविणार असल्याचा धमकीचा ईमेल आला होता. धमकी देणाऱ्यांनी ५०० कोटी रुपये आणि तुरुंगवास भोगत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या सुटकेची मागणीही केली होती. त्यानंतर या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चौकशी सुरू केली होती.
हे ही वाचा :