Film Rama Rao On Duty : रवि तेजा कोण आहे?

ravi teja
ravi teja

पुढारी ऑनलाईन डेस्क

रवि तेजा या साऊथ सुपरस्टारचा आगामी चित्रपट रामाराव ऑन ड्यूटीचा टीझर रिलीज झाला आहे. याच्‍या टीझरमध्ये 'मास महाराजा' गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे. खिलाडी  चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर रवि तेजा यानेआगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटामध्ये तो उपजिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तो गरीब आणि गरजूवंत लोकांसाठी सिस्टीमसोबत लढताना दिसेल. आता पाहणं उत्सुकतेच ठरेल की, तेजा पुन्हा यशस्वी कमबॅक करू शकेल का नाही?

महाशिवरात्रीच्या निमित्ताने रामाराव ऑन ड्युटी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. सारथ मंडावा ( Sarath Mandava) याने या चित्रपटातून दिग्दर्शन विश्वात पाऊल ठेवले आहे. रामाराव ऑन ड्युटीमध्ये साऊथ स्टार तेजा मुख्य भूमिकेत आहे.

तेजा हा बी रामाराव नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. तो एक शिस्तप्रिय उपजिल्हाधिकारी म्हणून ओळखला जातो. टीझरमध्ये, दिग्दर्शकाने नायकाची एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची क्षमता ठळक करण्यासाठी बरेच फुटेज वापरले आहे. जे अभिनेत्याला पात्र साकारताना उपयोगी ठरले असून एक मनोरंजक गोष्ट आहे.

या चित्रपटात  तेजा एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी म्हणून प्रखर भूमिका बजावत आहे. जो कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गैर करणार नाही.दाेन मिनिटांच्या टीझरमध्ये हा चित्रपट सामाजिक संदेशासह प्रेक्षकांना ॲक्शनची मेजवाणी देणारे ठरणार आहे. "पुरावा नसला तरी गुन्हेगारांना शिक्षा होईल", या डाॅयलाॅगने  टीझरचा शेवट हाेताना दिसतोय.

या चित्रपटामध्‍ये दिव्याशा कौशिक, राजिशा विजयन, वेणू थोटेमपुडी, नासेर, सीनियर नरेश, पवित्र लोकेश, 'सरपट्टा' जॉन विजय, चैतन्य कृष्णा, तनिकेला भरणी, राहुल रामा कृष्णा, एरोजुलो श्री, मधु सुदन राव आणि सुरेखा या कलाकारांच्‍या भूमिका  आहेत. 'रामाराव ऑन ड्युटी' २५ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

कोण आहे रवि तेजा?

तेजा टॉलीवूड इंडस्ट्रीत तीन दशकांपासून काम करत आहे. त्याचा जन्म २६ जानेवारी, १९६८ रोजी आंध्रप्रदेशातील जग्गमपेटामध्ये झाला होता. त्याचं संपूर्ण नाव रविशंकर राजू भूपतिराजू असं आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याला 'मास महाराजा' (Mass Maharaja) नावानेही ओळखले जाते. त्याने आपल्या करिअरची सुरुवात  १९९० मध्ये 'कर्तव्यम' मध्ये सपोर्टिंग आर्टिस्ट म्हणून केली होती.या चित्रपटानंतर त्याला कामे मिळणे बंद झाले होते. कधी-कधी त्याला छोट्या-मोठ्या भूमिका मिऴायच्या.

१९९६ मध्ये तेजाची भेट कृष्ण वाम्सीशी झाली होती. त्यांनी रविला आपला चित्रपट 'नेने पल्लदुथा'मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम दिलं आणि एक छोटी भूमिका देखील दिली. तेजाने इतका चांगला अभिनय केला की, 'सिंधुरम'मध्ये त्याला सहाय्यक भूमिका दिली. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. १९९९ मध्ये 'नी कोसम' चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून भूमिका मिळाली. या चित्रपटासाठी त्याला नंदी ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

तेजाने २६ मे, २००२ कल्याणीसी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. त्याच्या मोठ्या मुलीचे नाव मोक्षदा आणि मुलाचे नाव महाधन भूपतिराज आहे. तेजाने 'सिंदूरम', 'वेंकी', 'डॉन सीनू', 'बंगाल टायगर', 'राजा द ग्रेट', 'बालुपु' यासारख्या चित्रपटामध्ये काम केलंय. अक्षय कुमारचा 'राउडी राठौड' हा साऊथ इंडस्ट्रीतील तेजाच्या चित्रपटाचा हिंदी रीमेक है. सलमान खानचा 'किक' हादेखील तेजाच्या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news