पुढारी ऑनलाईन डेस्क : खोके कुणाकडे गेले एक दिवस नक्की सांगू. पण फ्रिजचा बॉक्स भरुन कोणाकडे काय काय गेले हे सांगू का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला आज केला. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत शिंदे सरकारवर केलेल्या टीकेला त्यांनी एका वृत्तवाहिनेशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले.
या वेळी केसरकर म्हणाले, ६७ वर्षांचा आमदार ज्यावेळी रस्त्यावर उभारून तुमच्याशी संवाद साधत होता. मात्र तुम्ही याकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्ही कोणाला गद्दार म्हणता ? तुम्ही खोटे बोलण्याची मोहीम सुरुच ठेवली आहे. तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील बोलू. खोके कुणाकडे गेले एक दिवस नक्की सांगू. पण फ्रिजचा बॉक्स भरुन कोणाकडे काय काय गेले हे सांगू का? असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
हेही वाचा