wrestlers protest : कुस्तीपटूंची आंदोलनातून माघार! साक्षी मलिक म्हणाली, रेल्वेत जबाबदारी पार पाडत आहे, लढाईतून…

wrestlers protest : कुस्तीपटूंची आंदोलनातून माघार! साक्षी मलिक म्हणाली, रेल्वेत जबाबदारी पार पाडत आहे, लढाईतून…

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी या आंदोलनातून माघार घेतली असून ते रेल्वेत नोकरीवर परतले असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यानंतर साक्षीने ट्विट करून या वृत्तांचे खंडन केले. तिने ट्विटमध्ये ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आपल्यापैकी कोणीही मागे हटले नसल्याचे म्हटले आहे.

साक्षी मलिकने ट्विटमध्ये लिहिले, "ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आपल्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणारही नाही. आंदोलनासोबतच मी रेल्वेतील माझी जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच आहे. कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका," अशी विनंती तिने केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news