Fifa World Cup : अर्जेंटिना वर्ल्डकप फायनलमध्ये

Fifa World Cup : अर्जेंटिना वर्ल्डकप फायनलमध्ये
Published on
Updated on

दोहा (वृत्तसंस्था) : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या (Fifa World Cup) सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने गत उपविजेत्या क्रोएशियाचा ३-० गोलने धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह अर्जेंटिनाच्या संघाने आठ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. विश्वचषकाच्या इतिहासात अर्जेंटिना आता सहाव्यांदा फायनल खेळणार आहे. १८ डिसेंबरला फिफा वर्ल्डकपचा फायनल सामना होणार आहे.

सेमी फायनलच्या पहिल्या हाफमध्ये क्रोएशियाच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. पण सामन्याच्या 34 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पाचव्या मिनिटाला ज्युलिएन अल्वारेजने अफलातून गोल नोंदवला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने गोलचे ५ प्रयत्न केले तर क्रोएशियाने ४ वेळा गोलचा प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये सर्वाधिक चेंडू क्रोएशियन संघाकडे ६२ टक्के आणि अर्जेंटिनाकडे केवळ ३८ टक्के होता. (Fifa World Cup)

मध्यंतरानंतर अर्जेंटिनाने आणखी एक गोल नोंदवला. ६९ व्या मिनिटाला मेस्सीने अल्वारेजकडे पास टाकला आणि अल्वारेजने कोणतीही चूक न करता गोल केला. अल्वारेझनेही मिळालेल्या संधीचे सोने करत आपला दुसरा तर संघासाठी तिसरा गोल केला. क्रोएशियाच्या संघाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही.

हेही वाचा…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news