England vs USA FIFA World Cup 2022 : फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०२२ च्या सहाव्या दिवसाचा शेवटचा सामना रोमांचक झाला. इंग्लंड विरुद्ध अमेरिका यांच्यात अल बायेत स्टेडियमवर झालेला हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. अमेरिकेच्या संघाने हॅरी केन यांच्या नेतृत्त्वाखालील मजबूत इंग्लंडला हा सामना जिंकण्यापासून रोखले. इंग्लंडचा हॅरी केन याची जादू या सामन्यात चालली नाही. दोन्ही संघातील खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण दोन्हीकडून एकही गोल झाला नाही. या सामन्यानंतर इंग्लंड ग्रुप बी मध्ये ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव आणि दुसरा सामना वेल्स विरुद्ध जिंकल्यानंतर इराण ३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
तर पहिल्यांदा वेल्स आणि आता इंग्लंड विरुद्ध सामना ड्रा झाल्याने ग्रुप बी मध्ये अमेरिका २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. वेल्सचा पुढील फेरीतील प्रवास खडतर आहे. वेल्स एक विजय आणि एक ड्रा सामन्यामुळे गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच चौथ्या स्थानी आहे. या समीकरणानुसार जर इंग्लंडने वेल्सविरुद्ध विजय मिळवला तर तो राउंड ऑफ १६ मध्ये पोहोचेल आणि वेल्स बाहेर होईल. या स्थितीत इराण आणि अमेरिका विरुद्धच्या सामन्यात विजयी संघ अंतिम १६ मध्ये प्रवेश करेल. जर सामना ड्रा राहिल्यास इराण पुढील फेरीत प्रवेश करेल.
अमेरिकेने पहिल्या हाफमध्ये इंग्लंडच्या तुलनेत गोलपोस्टवर अधिक शॉट्स मारले. इंग्लंडने ८ वेळा गोलपोस्टला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, जो अमेरिकेपेक्षा कमी होता. या आठपैकी तीन शॉट्स टार्गेटवर लागले पण अमेरिकन गोलकीपरने गोल होण्यापासून ते वाचवले. (England vs USA FIFA World Cup 2022)
हे ही वाचा :