FIFA WC Injuries: मेस्सीच्या अर्जेंटिनाला झटका! दोन स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर

FIFA WC Injuries: मेस्सीच्या अर्जेंटिनाला झटका! दोन स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA WC Injuries : फिफा विश्वचषक (FIFA WC 2022) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अर्जेंटिनाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन स्टार खेळाडू निकोलस गोन्झालेझ आणि जोक्विन कोरिया हे दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने (एएफए) याबाबत माहिती दिली आहे.

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने गुरुवारी रात्री दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आजच्या सराव सत्रानंतर निकोलस गोन्झालेझला स्नायूंना दुखापत झाली असून तो यापुढे विश्वचषक संघात असणार नाही. त्याच्या जागी एंजल कोरियाचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर संघाचा आणखी एक स्टार फुटबॉलपटू जोक्विन कोरिया हा सुद्धा जायबंदी झाल्याने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे एएफएने सांगितले आहे. (FIFA WC Injuries)


गोन्झालेझ आणि जोक्विन कोरिया सारखे खेळाडू संघातून बाहेर पडल्याने अर्जेंटिना संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, बचावपटू क्रिस्टन रोमेरो, फॉरवर्ड खेळाडू अलेजांद्रो गोमेझ आणि पाउलो डिबेला हे खेळाडू फिटनेसशी झुंजत आहेत. हे तिन्ही खेळाडू 16 नोव्हेंबरला अर्जेंटिनाच्या सराव सामन्यातही दिसले नव्हते. (FIFA WC Injuries)

अर्जेंटिनाचा सराव सामन्यात युएईवर 5-0 ने विजय

फिफा विश्वचषक 2022 पूर्वी सराव सामने सुरू झाले असून अर्जेंटिनाने अंतिम सराव सामन्यात यूएईचा 5-0 ने पराभव करत धुव्वा उडवला. सात वेळचा बॅलोन डी'ओर विजेता लिओनेल मेस्सीने हाफ टाईमपूर्वी संघासाठी चौथा गोल करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी, त्याने 17व्या मिनिटाला अर्जेंटिनाला आघाडी मिळवून देणाऱ्या ज्युलियन इव्हारेसच्या गोलमध्येही सहकार्य केले. संघाकडून एंजल डी मारियाने दोन, तर जोकुन कोरियाने एक गोल केला. मेस्सीने अर्जेंटिनासाठी गेल्या पाच सामन्यांमध्ये 10 गोल केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय गोलांची संख्या 91 वर पोहोचली आहे. अर्जेंटिना 22 नोव्हेंबर रोजी क गटात सौदी अरेबियाविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news