Tiger Attack : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी, वनमजूर जखमी

Tiger Attack : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी, वनमजूर जखमी

शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्याला व त्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वनकर्मचाऱ्याला पट्टेदार वाघाने हल्ला (Tiger Attack) करून जखमी केले आहे. या घटनेत दोघे जखमी झाले असून ही घटना काल सोमवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चिमूर तालुक्यातील मासळ परिसरातील करबडा शेतशिवारात घडली. या घटनेमुळे ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या गावातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. शेतकरी रूपेश गंधारे व वनकर्मचारी दिवाकर गावडे असे जखमींचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील मासळ येथील शेतकरी रुपेश गंधारे हे स्वतःच्या शेतात काम करीत होते. तसेच पराटी काढण्यासाठी काही महिलाही शेतात काम करीत होत्या. या ठिकाणी वाघाची चाहूल लागताच महिला मजूर घरी परत आल्या. तर शेतकरी गंधारे हे शेतात काम करीत होते. शिकारीच्या शोधात शेतात आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्याने शेतकरी गंधारे गोधळे आणि जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागले. आरडाआओरड केल्याने वाघही घाबरला. त्यामुळे वाघाने त्यांना सोडले. यात ते जखमी झाले. लगेच त्यांनी रस्ता गाठला व ये जा करणाऱ्या लोकांना आपबीती सांगितली. काही नागरिकांनी लगेच वनविभागाला माहिती दिली.

तात्काळ वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वाघ हा शेतात दबा धरून बसला होता. त्याला जंगलाकडे हाकलण्यासाठी वन कर्मचारी व वनमजूर गेले असता त्यांच्यावर सुद्धा वाघाने झडप घातली. यात दिवाकर गावडे वनमजूर जखमी झाले. त्यांच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमींना या उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. वनविभागाने या ठिकाणी व परिसरात गस्त वाढविली आहे.

Tiger Attack : पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर, शेतकरी दहशतीत

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव वन परिक्षेत्रात येणाऱ्या परिसरात वाघांचा खूप वावर आहे. सदर घटना ही चिमूर मासळ पळसगाव सिंदेवाही मार्गावरील मासळ जवळील झिल रिसॉर्ट जवळील रुपेश गंधारे या शेतकऱ्यांच्या शेतात घडली. सदर पट्टेदार वाघाने काल गंधारे यांच्या शेतात रानडुक्कराची शिकार केली होती अशी माहिती आहे. त्या शिकारीला खाण्यासाठी तिथे वाघ आला असल्याचे समजते. बाबा बहिरणे लागून असलेल्या अनेक गावांत वाघाचा वावर असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. वन विभागाने तात्काळ या परिसरात वाघापासून नागरिकांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : माळरानांवरील रहस्यमय प्राणी लांडगा! Wolf the Mysterious predator of grassland

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news