Fahmaan Khan Casting Couch : मला मागून पकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला

Fahmaan Khan
Fahmaan Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेता फहमान खान प्रसिद्ध चेहरा आहे. पण एक वेळ अशी होती की, जेव्हा फहमानला काम मिळत नव्हतं. इतकचं नाही तर फहमानने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचविषयी सांगितले, (Fahmaan Khan Casting Couch) जे खूपच धक्कादायक आहे. अभिनेते फहमान खान २०१४ मध्ये बंगळुरवरून मुंबईत आला. अभिनयासाठी ऑडिशन देणे सुरू केलं. काम मिळालं. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. दरम्यान, फहमानने कामाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, त्याला कशाप्रकारे कास्टिंग काउचला सामोरे जावं लागलं होतं. (Fahmaan Khan Casting Couch)

फहमानने आपल्या पहिल्या शो विषयी सांगितले की, 'शो सुरू होण्यासाठी आठ महिने होते. त्यावेळी मी एका घरात १७ लोकांसोबत राहत होतो. सांताक्रूझमध्ये 2.5BHK होता आणि १७ लोक राहायचे. साखर देखील तिजोरीत लॉक करावे लागायचे. मला शोतून बाहेर काढण्यात आलं. मी विचार केला की, मी इतका वाईट आहे की, लोक तुम्हाला बदलत आहेत. मी कुणाशी बोलू शकलो नाही. मी पुन्हा ऑडिशन देणे सुरू केले. पण, माझे मानसिक आरोग्य ठिक नव्हतं.'

कास्टिंग काउचवरुन खुलासा

आता माणसे फोन करत आहेत. मला काम मिळणार म्हणून अनेक लोकांना भेटलो. अनेकांनी विचित्र अटी ठेवल्या. पैकी कास्टिंग काउचविषयी फहमान म्हणाला, 'मी जीवनात मॉडलिंग केली आहे. मी डिझायनर्ससोबत राहिलो आहे. करिअरच्या सुरुवातीला फहमान एका कास्टिंग डायरेक्टरला भेटला. तो प्रसिद्ध अभिनेत्यांची नावे घेत होता आणि कामे मिळवण्यासाठी त्यांना काय करावं लागलं हे सांगत होता. मला समजलं की, त्याला काय हवंय. मी त्याला शेवटी जे काही स्पष्ट आहे ते सांगा असे म्हणालो. मी म्हणालो, आभारी आहे. ठिक आहे. पण मी तसा मुलगा नाही. ज्यावेळी मी बाहेर पडत होतो, त्यावेळी तो मागून आला आणि मला पकडले. मला चुकीचा स्पर्श केला. मी त्याला धक्का दिला. त्याने मला पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली. मी म्हणालो की, पोलिस येण्यास १५ मिनिटे तरी लागतील. मी तोपर्यंत तुझ्या डोक्यावर लाथ मारेन.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Fahmaan Khan (@fahmaankhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Fahmaan Khan (@fahmaankhan)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news