Layoffs in Meta – फेसबुकची मूळ कंपनी मेटातून ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात

Facebook CEO Mark Zuckerberg pudhari.com
Facebook CEO Mark Zuckerberg pudhari.com
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने जगभरातील ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये ही माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरनंतर मेटाने कर्मचारी कपात केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राताला मोठा धक्का बसला आहे. (Layoffs in Meta)

झुकबर्ग म्हणाले, "मेटाच्या इतिहासातील हा सर्वांत कठीण बदलाची मी आज घोषणा करत आहे. मी १३ टक्के, म्हणजे ११ हजार इतक्या बुद्धिमान कर्मचाऱ्यांना जाऊ देत आहे,"

याशिवाय खर्च कमी करण्यासाठी इतरही उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच नव्याने नोकर भरतीवर बंद ठेवण्यात येणार असल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

कामावरून कमी केलेल्या कर्मचार्यांना १६ आठवड्यांचे मूळ वेतन, सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी २ आठवड्यांचे वेतन, सहा महिन्यांसाठी आरोग्याचा खर्च अशी भरपाई मेटा देणार आहे.

गेल्या काही महिन्यात डिजिटल जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न घटत असल्याने मेटाच्या उत्पन्नाला फटका बसला आहे, तसेच मंदीची भीती व्यक्त होत असल्याने मेटाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याशिवाय झुकरबर्ग यांनी व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये मोठी गुंतवणूक केल्याने, मेटाचे उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झालेला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news