पुढारी ऑनलाईन: फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मोफत सेवा आता बंद होणार असून, यासाठी यूजर्संना पैसे द्यावे लागणार आहेत. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतेच फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी पेड सब्सक्रिप्शन मॉडेल लॉन्च केले आहे. यामुळे यूजर्संना आता ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागणार आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांकडून मोफत व्यवसाय बंद केला जात आहे. जिथे काही काळापूर्वी ट्विटरने पेड ब्लू टिक सेवा सुरू केली होती. यासाठी ट्विटर यूजर्संना दरमहा 11 डॉलर ते 14 डॉलर शुल्क आकारत आहे. आता ट्विटरच्या वाटेवरच मेटा कंपनीची देखील वाटचाल सुरू झाली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम ब्लू टिकसाठी शुल्क आकारणार योणार असल्याचे मेटाने जाहीर केले आहे. म्हणजे जर तुम्हाला Facebook किंवा Instagram वर प्रीमियम पडताळणी सेवा हवी असेल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन मॉडेलवर यावे लागेल आणि आकारण्यात आलेले शुल्क द्यावे लागेल.
मार्क झुकरबर्गने जाहीर केलेल्या धोरणानुसार Facebook-Instagram च्या ब्लू टिकला शुल्क आकारण्यात येणार आहे. Facebook आणि Instagram च्या वेब यूजर्संना 11.99 डॉलर आणि iOS यूजर्संना 14.99 डॉलर प्रति महिना शुल्क आकारण्यात येणार असल्याचे मेटाने स्पष्ट केले आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच इतर काही देशांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू होणार असल्याचे मेटाचे प्रमुख झुकेरबर्गने यांनी स्पष्ट केले आहे.
Instagram आणि Facebook पेड सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये वापरकर्त्यांना काही विशेष सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये यूजर्संना एचडी व्हिडिओ अपलोड करण्यासोबतच इतरही अनेक सेवा देण्यात येणार आहेत. आतापर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध लोकांना ब्लू टिक व्हेरिफिकेशन दिले जात होते. पण आता इतरांना देखील ही सेवा देण्यात येणार आहे. यामध्ये निर्माते, कंपन्या, ब्रँड यांचा समावेश असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा