लोकशाहीची उघडपणे हत्या, सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा : संजय राऊत

लोकशाहीची उघडपणे हत्या, सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत २०२१ मध्येही चर्चा झाली होती. परंतु युतीची बोलणी सुरू असतानाच विधानसभेतून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले. भाजप पक्षश्रेष्ठी यामुळे नाराज झाल्याने युतीची चर्चा थांबल्याचा गौप्यस्फोट खा. राहुल शेवाळे यांनी केला. त्यांच्या या दाव्याचं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे. ब्लू सी हॉटेलमध्ये ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता, पण भाजपने शब्द पाळला नाही. फूटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली आहे. लोकशाहीची उघडपणे हत्या सुरू असून सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलं असा दावा सुद्धा फूटीर गट करेल. चंद्रावरसुद्धा कार्यालय स्थापन करतील एवढे हवेत त्या गटातील नेते आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. ईडीच्या पत्राबाबत बोलताना त्यांनी राजकीय घडामोडी पाहता समन्स येईल हे माहीत होतं. मी ईडीला चौकशीसाठी सहकार्य करणार आहे. अधिवेशन सुरू असल्याने पुढील तारीख देण्याची मागणी वकील करतील असे त्यांनी सांगितले.

तसेच रावसाहेब दानवे यांच्या टीकेला त्यांनी प्रतिउत्तर देताना म्हणाले की, दानवे अजून पाताळात फिरत असून ते अजून पृथ्वीवर यायचे आहेत. २०१९ ला भाजपने दिलेला शब्द तोडला तेव्हा संजय राऊत त्या चित्रात कोठे होते? याच उत्तर त्यांनी द्यावे असा सवाल त्यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कायदा आणि घटनेची पायमल्ली करून, फूटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होतं आहे. पक्षांदर बंदी कायद्यातील नियमांच पालन केले जात नाही. विरोधी पक्ष फोडला की आनंदात काही निर्णय घेतले जातात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news