पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट पीजी (NEET PG 2022) परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच दिले जाणार आहेत. २१ मे रोजी नीट पीजी परीक्षा होणार आहे. परंतु, या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनी परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली दोन न्यायाधिकांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीत नीट परीक्षा २०२२ पुढे ढकलली जाणार नाही. असे स्पष्ट केले. परीक्षा पुढे ढकलणे म्हणजे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
नीट पीजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थी जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांना आरोग्य मंत्रालयालाही पत्र लिहून परीक्षा ८ आठवड्यांपर्यंत स्थगित करण्याची विनंती केली होती. अधिवक्ता आशुतोष दुबे आणि अभिषेक चौहान यांच्या माध्यमांतून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते की, याचिकाकर्ते डाॅक्टर आहेत जे देशातील विविध रुग्णालयांमध्ये इंटर्नशिप करत आहेत. ते २१ मे रोजी नियोजित नीट पीजी परीक्षेत २०२२ परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात.
या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती की, "नीट पीजी २०२२ परीक्षेसंदर्भात आयुर्विज्ञानमध्ये राष्ट्रीय परीक्षा बोर्ड २ फेब्रुवारी अधिसूचना काढण्यात आली होती, ती रद्द करावी किंवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी." याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी आणि अभ्यर्थी उमेदवार आहे जे नीट पीजी २०२१ च्या परीक्षेला बसलेले होते आणि आता सुरु असलेल्या कौन्सलिंग प्रक्रियेत सहभागी आहेत."
पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. असे करणे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.
हे वाचलंत का?