७ कोटी नोकरदारांसाठी गुड न्यूज! EPFO कडून व्याजदरात वाढ

७ कोटी नोकरदारांसाठी गुड न्यूज! EPFO कडून व्याजदरात वाढ
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याज दर जाहीर केला आहे. याबाबत EPFO ने आज २४ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे. देशभरात सुमारे ७ कोटी लोक ईपीएफओचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.१० टक्के होता. तो आता वाढवण्यात आला आहे.

ईपीएफओने २८ मार्च २०२३ रोजी २०२२-२३ करीता हा व्याज दर देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी हा व्याजदर ८.१० टक्के होता. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ईपीएफओने विभागीय कार्यालयांना २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के व्याज दर सदस्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थ मंत्रालयाने सहमती दर्शवल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले आहे.

EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, १९५२ च्या पॅरा ६०(१) अंतर्गत केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, २०२२-२३ साठी ८.१५ टक्के व्याज दर प्रत्येक EPF सदस्याच्या खात्यात जमा करण्याची मंजुरी दिली आहे. त्यानुसार आपणास विनंती आहे की, सदर व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात."

मार्च २०२२ रोजी २०२१-२२ करीता ईपीएफ वरील व्याज दरात कपात करीत ८.१० टक्के करण्यात आला होता. १९७७-७८ च्या ८ टक्क्यांच्या खालोखाल हे दर सर्वात कमी होते. गेल्या चार दशकांमध्ये हा व्याजदर सर्वाधिक कमी होता. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात हा व्याजदर ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के व्याज मिळाले होते.

श्रम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात ३ हजार ६७३ प्रतिष्ठानांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणले. मे महिन्यात ईपीएफओ सोबत ८.८३ लाख नवीन सदस्य जोडले होते. गत सहा महिन्यातील हा विक्रमी आकडा आहे. नवीन सदस्यांमध्ये ५६.४२ टक्के १८ ते २५ वयोगटातील कर्मचारी आहे.

पीएफ खात्यावरील जमा रक्कम तुम्ही चार पद्धतीने चेक करु शकता. उमंग ॲप, ईपीएफ मेंबर ई-सेवा पोर्टल, मिस्ड कॉल तसेच एसएमएस पाठवून पीएफ खात्यावरील रक्कम पाहता येते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे पगारदार नोकरदारांसाठी अनिवार्य योगदान आहे. महिन्याच्या आधारावर, एक कर्मचारी त्याच्या कमाईच्या १२ टक्के रक्कम त्याच्या EPF मध्ये योगदान देतो.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news