मालगाडीचे इंजिन फेल; पुणे-मुंबईदरम्यानच्या गाड्यांना दीड तास उशीर

मालगाडीचे इंजिन फेल; पुणे-मुंबईदरम्यानच्या गाड्यांना दीड तास उशीर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शेलारवाडीजवळ एका मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे बुधवारी सकाळी पुणे-मुंबईदरम्यान होणारी रेल्वेची प्रवासी वाहतूक काही काळ ठप्प होती. अनेक गाड्यांना मुंबईला पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांची नियोजित कामे रखडली होती.

सकाळी 9.18 मिनिटांनी शेलारवाडी येथे एका मालगाडीचे इंजिन (लोको) अचानक बंद पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला पुणे-मुंबई दरम्यान होणारी प्रवासी वाहतूक काही वेळ थांबवावी लागली. मात्र, रेल्वेने सकाळी 9.35 वाजता घोरपडी येथून दुसरे इंजिन आणून बसवले. त्यानंतर मालगाडी मार्गस्थ झाल्यानंतर थांबलेली प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

या गाड्यांना झाला उशीर

– मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (12127) या गाडीला 88 मिनिटे उशीर झाला.
– तळेगाव-पुणे लोकल (01587) या गाडीला 69 मिनिटे उशीर झाला.
– लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टणम (18520) या गाडीला 53 मिनिटे उशीर झाला.
– मुंबई-पुणे (डेक्कन एक्सप्रेस-11007) – या गाडीला 17 मिनिटे उशीर झाला.
– लोणावळा-पुणे लोकल (01559) या गाडीला 21 मिनिटे उशीर झाला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news