Emergency Landing: लष्कराच्या ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; वैमानिकाने J&K मध्ये केले आपत्कालीन लँडिंग

Emergency Landing
Emergency Landing

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वैमानिकाने प्रसंगसावध होत, शेतातच हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. ही घटना आज (दि.४) दुपारी १२ वाजतेच्या सुमारास घडली. दरम्यान यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान होते. असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Emergency Landing)

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील हातल गावाजवळ (ता.सुंदरबनी) लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाने सावधगिरीने लँडिंग केले. त्यानंतर भारतीय लष्कराचे विमान पुन्हा त्याच्या स्थानावर परतले आहे, अशी माहिती भारतीय लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे. असे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Emergency Landing)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news