Emergency Landing of Plane : मुंबई विमातळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग | पुढारी

Emergency Landing of Plane : मुंबई विमातळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या अकासा एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांच्या छातीत दुखत असल्याने मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर त्याच प्रवाशाने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती विमान कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर मुंबई विमातळावर काही वेळासाठी खळबळ उडाली. पोलीस तपासात मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

अकासा एअरलाइन्सचे विमान क्रमांक

क्यूपी ११४८ हे विमान शुक्रवारी रात्री12 वाजून 7 मिनिटानी पुण्याहून १८५ प्रवासी घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले होते. मात्र,विमानाने हवेत झेप घेताच एका प्रवाशाने छातीत दुखत असल्याची तक्रार क्रू मेंबर्सकडे केली. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती पाहता क्रू मेंबर्सने विमान तात्काळ मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेतला. वैमानिकानी सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियांचे पालन करत मुंबई विमानतळावर उतरविले. त्यानंतर त्याच प्रवाशाने स्वतःच्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर विमातळावर खडबड उडाली. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. रात्री 2 वाजून 30 मिनिटानी बॉम्ब शोधक पथकाने विमानातील सामानाची पाहणी केली. तसेच त्या प्रवाशांच्या बॅगेची झडती घेतली . मात्र तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.त्यानंतर शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विमान दिल्लीकरीता रवाना करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणात प्रवाशांच्या सोबत असलेल्या कुटूंबियाची चौकशी सुरू केली. चौकशीत कुटूंबियानी सांगितले की, औषधांच्या प्रभावामुळे तो असे बरगळत असल्याचे सांगितले. मात्र, याप्रकरणी विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहे. तसेच रुग्ण प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Back to top button