Ben Stokes : भर सामन्यात तरूणीने केले बेन स्टोक्सला प्रपोज

Ben Stokes : भर सामन्यात तरूणीने केले बेन स्टोक्सला प्रपोज

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतीच न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. मालिकेत सामन्यात दोन्ही संघांनी एक-एक सामन्यात वि़जय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. दुसऱ्या कसोटीचा शेवट मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे झाला. हा कसोटी सामना खूपच रोमांचक झाला (Ben Stokes)

या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर 1 धावेने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे त्यांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यावेळी मैदानात असे काही घडले की, ज्यामुळे मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जाणून घेऊया नक्की मैदानावर काय घडले… (Ben Stokes)

अन् तरूणीनं केल बेनला प्रपोज

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना पाहण्यासाठी एक तरूणी आपल्या प्रियकरासोबत मैदानावर आली होती. यावेळी तिने आपल्यासोबत एक पोस्टर आणले होते. त्यावर असे लिहले होते की, "बेन, माझा बॉयफ्रेंड इथे क्रिकेट पाहण्यासाठी आला आहे, आणि मी तुला पाहण्यासाठी आले आहे. यावेळी, कॅमे-याच्या माध्यमातून हे पोस्टर मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर दाखवले. त्यावेळी चाहतीला स्क्रीनवर पाहून स्टोक्सने स्माईल दिली.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news