पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी २ फेम एल्विश यादवने रागाच्या भरात एका व्यक्तीला थप्पड लगावली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका अज्ञात व्यक्तीने एल्विश यादवच्या परिवाराबद्द कॉमेंट केली. हे ऐकून एल्विशला राग आला आणि त्याने अज्ञात व्यक्तीला थप्पड लगावली. काही फॅन पेजने, त्या व्यक्तीने एल्विशबद्द्ल काही पर्सनल कॉमेंट्स केले होते. त्यामुळे एल्विशला राग आला, असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या-
एल्विशने नंतर या घटनेविषयी बोलताना एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, त्या व्यक्तीला थप्पड मारल्याबद्दल कोणतीही पश्चाताप नाही. एका वेबसाईटनुसार, एल्विश म्हणाला, 'भावांनो, पाहा, मॅटर हा आहे, मला हौस नाही भांडणे करण्याचे आणि मी उगाच हात उचलला नाही. मी कामाशी काम ठेवतो. मी एख सामान्य माणूस आहे. ज्यांना फोटो काढायचा असतो, आम्ही काढू देतो. आम्ही म्हणतो की, सावकाश फोटो घ्या. पण, जो कुणी मागून कॉमेंट पास करतो, त्याला सोडत नाही.'
एल्विशने पुढे म्हटलं, 'तुम्हाला दिसत आहे का, सोबत पोलिसदेखील चालत आहे आणि कमांडो देखील आहे. कुणीतरी माझ्या आई-बहिणवरून शिव्या देईल, तर त्याला सोडणार नाही….'
Sunny. नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.