Rakul Preet Singh Marriage : रकुलच्या घरी लग्नाची जोरदार तयारी; व्हिडिओ व्हायरल

Rakul Preet Singh Marriage
Rakul Preet Singh Marriage

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक दिवसांच्या डेटिंगनंतर बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रकुल आणि जॅकी यांचा विवाह २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात मोठ्या उत्साहात होणार आहे. यासाटी दोन्ही कुटूंबियाकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यानच रकुलचे नवेनवे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( Rakul Preet Singh Marriage )

संबंधित बातम्या 

अभिनेत्री रकुल प्रीतच्या घरी लग्नाच्या आधी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यादरम्यान रकुल तिच्या कुटुंबियांसह काही मोजक्याच मित्रांसोबत दिसली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत रकुलच्या कुटूंबिय गडबडीत असून काही सामान आणताना दिसत आहेत. यावेळी रकुलने ब्लॅक रंगाचा साटनचा शर्ट, व्हाईट-ब्लॅक रंगाचा डिझाइन स्कर्ट परिधान केला होता. यासोबत तिने ब्लॅक रंगाचे शूजही घातले होते.

यावेळी पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर तिच्यावर पडली. रकुलने एकापैक्षा एक हटके पोझ पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला दिली आहे. याव्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "नववधू #RakulPreetSingh शहरात बाहेर पडताना तिच्या प्रियजनांसोबत सौंदर्य पसरवते❤️❤?". असे लिहिले आहे. रकुलच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो स्पष्टपणे दिसत आहे. रकुलसोबत तिच्या आई-वडिलांसोबत कॅमेरासमोर पोझ दिल्या आहेत. तर जॅकी भगनानीने त्याच्या घरी लग्नापूर्वी अखंड पाठ ठेवला होता. यावेळचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

रकुल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली असून ती २१ फेब्रुवारीला गोव्यात चित्रपट निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. वर्क्रफन्टबद्दल बोलायचे झाल्यास तिने २०१४ मध्ये 'यारियां' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. याशिवाय रकुल आगामी 'मेरी पत्नी का रीमेक' आणि कमल हासन याच्या 'इंडियन २' मध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news