Love Sex Aur Dhokha 2 : बिग बॉसमध्येच असताना निमृतसाठी गुड न्यूज! एकता कपूरचा मिळाला चित्रपट

nimrit ahluwalia
nimrit ahluwalia

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही क्वीन एकता कपूर 'लव सेक्स और धोखा' चित्रपटाच्या यशानंतर दुसरा भाग बनवण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, ती दिबाकर बॅनर्जीसोबत बिग बॉस १६मध्ये एन्ट्री करेल आणि अधिकृतपणे 'लव सेक्स और धोखा २' ची घोषणा करेल, (Love Sex Aur Dhokha 2) अशी माहिती समोर आलीय. दरम्यान, एकताकडून या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. आता हा शोध संपला आहे. एकताने बिग बॉस १६ मधील स्पर्धक निमृत कौर अहलूवालियाला लव सेक्स और धोखाच्या दुसऱ्या भागासाठी साईन केल्याची माहिती समोर आलीय. (Love Sex Aur Dhokha 2)

सूत्रांनुसार, एकता कपूर आज बिग बॉस १६ मध्ये निमृत कौर अहलूवालिया साईन करण्यासाठी शोमध्ये एन्ट्री करेल. निमृतने हा चित्रपट स्वीकारला तर तिचा हा बॉलीवूड डेब्यू चित्रपट असेल.

'लव सेक्स और धोखा २'

एकता कपूरने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर दिबाकर बॅनर्जीसोबत एक फोटो शेअर केला होता. पोस्टमधील कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- 'आवडती फ्रेंचायजी सुरू होतेय तयारी #lsd2.'

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news