Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांना आवाहन, ‘मला मंत्रीपद नको पण,…’

File Photo
File Photo

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यावर लगेच दुसऱ्याच दिवसशी महाराष्ट्राला राजकीय भूकंपाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे (Shivsena) नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन आपल्या समर्थक आमदारांसोबत गुजरातच्या सुरत येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आता एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे काम सुरु आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे  यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे प्रमुख नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकवून काही आमदारांसोबत ते सुरत येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप घडले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल २९ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. त्यांचा प्रमुख नेत्याने बंडाचे निशाण फडकावल्यामुळे महाराष्ट्रात मोठे उलाथापालथ होणार का हे पहावे लागेल.

दरम्यान, शिवसेनेकडून मंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे अंत्यंत निकटवर्ती समजले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. ही बैठक बऱ्याच वेळ चालल्याचे समजते. बैठकी दरम्यानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी व त्यांनतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केले असल्याचे माहिती समोर येत आहे.

मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी वाटल्यास मला मंत्री पद देऊ नका, पण भाजप सोबत युती करा, असे आवाहन केल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news