Byju’s ला ईडीचा दणका, ९ हजार कोटी भरण्यासाठी बजावली नोटीस

Byju's News
Byju's News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (ED) देशातील सर्वात मोठी एडटेक तंत्रज्ञान कंपनी 'बायजू'ला (Byju's) नोटीस बजावली आहे. परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 'बायजू'ला ९ हजार कोटी भरण्यास सांगितले आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, कंपनीने अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बायजू'ला २०११ ते २०२३ दरम्यान २८ हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. edtech प्रमुख 'बायजू'च्या सूत्रांनी सांगितले की, याच कालावधीत परदेशी अधिकारक्षेत्रात सुमारे ९,७५४ कोटी थेट परदेशी गुंतवणूक म्हणून पाठवले.

दरम्यान, Byju's ने हे वृत्त फेटाळले आहे. त्यांना ईडीकडून कोणतीही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. तसेच कंपनीला याबाबतही कोणतीही सूचना मिळालेली नाही," असे बायजूने स्पष्ट केले आहे.

एडटेक स्टार्टअपद्वारे मिळालेल्या गुंतवणुकीवर आणि परदेशात निधी हस्तांतरित केल्याबद्दल परकीय चलन नियमांचे कथित उल्लंघन केल्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने एप्रिलमध्ये बायजूशी संबंधित अनेक ठिकाणांची झाडाझडती घेतली होती.

बायजूची (edtech major Byju's) पेरेंट कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना २०११ मध्ये अभियंते आणि शिक्षक बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ यांनी केली होती. सुरुवातीला त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाइन शिक्षण उपक्रम राबविला होता.

२०१५ मध्ये कंपनीने Byju's Learning app लाँच केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दोन वर्षांनंतर त्यांनी मुलांसाठी गणित अॅप लाँच केले होते. २०१८ पर्यंत Byju चे १.५ कोटी यूजर्स होते. कोरोना काळात जेव्हा शाळा बंद करण्यात आल्या आणि मुलांना डिजिटल शिक्षणाकडे वळावे लागले. तेव्हा या ॲपच्या लोकप्रियतेला मोठी चालना मिळाली.

बायजूने पेमेंट चुकवल्याचा आणि कर्ज कराराचा भंग केल्याचा आरोप करून कर्जदात्यांनी अमेरिकेतील न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे कंपनीला परदेशातही अडचणीचा सामना करावा लागला. बायजूने नंतर कर्जदात्यांवर छळ केल्याचा आरोप करून खटला दाखल केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news