Hero Motocorp च्या अध्यक्षांच्या घरावर ईडीचे छापे, कारवाईनंतर शेअर्स गडगडले

Hero Motocorp च्या अध्यक्षांच्या घरावर ईडीचे छापे, कारवाईनंतर शेअर्स गडगडले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल (Hero Motocorp Executive Chairman Pawan Munjal) यांचे निवासस्थान आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने मंगळवारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींनुसार दिल्ली आणि शेजारील गुरुग्राम येथील परिसरांमध्ये संबंधितांच्या ठिकाणांची झडती घेण्यात आली.

बेहिशोबी परकीय चलन बाळगल्याच्या आरोपाखाली चौकशी करण्यात आलेल्या मुंजाल यांच्या जवळच्या कथित व्यक्तीविरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या तक्रारीवरून हा तपास सुरू करण्यात येत आहे.

दरम्यान, या घडामोडीमुळे कंपनीच्या शेअर्सला फटका बसला. दुपारी १ वाजता हिरो मोटोकॉर्पचे शेअर ४.४ टक्क्यांनी घसरून ३,०६३ रुपयांच्या दिवसाच्या निचांकी पातळीवर आले.

Hero MotoCorp वर मार्च २०२२ मध्ये आयकर विभागाने कथित करचुकवेगिरीप्रकरणी छापा टाकला होता. या कारवाईत हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता.

हिरो मोटोकॉर्प २००१ मध्ये एका कॅलेंडर वर्षात युनिट व्हॉल्यूम विक्रीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी बनली होती. गेली सलग २० वर्षे कंपनीने हे स्थान कायम राखले आहे. या कंपनीचा व्यवसाय आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ४० देशांमध्ये पसरलेला आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news